Mumbai : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोर्टाकडून दिलासा, बोगस मजूर प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

Continues below advertisement

बोगस मजूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.. तसंच दरेकरांना अटक झाली तर त्यांना 50 हजाराच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिलेत.. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकरांनी मजूर या गटातून निवडणूक लढवली होती. बोगस मजूर असल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अटकपूर्व जामिनासाठी दरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.. इतके वर्षे तपास सुरु असल्यानं कस्टडीची गरज नाही असं मत नोंदवत उच्च न्यायालयानं दरेकरांना दिलासा दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram