Pravin Chavhan: प्रविण चव्हाण प्रकरणात नवीन ऑडिओ क्लिप ABP Majha
Continues below advertisement
कार्यलयात छुपा कॅमेरा बसवून स्टिंग ऑपरेशन केल्याबद्दल विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे आणि त्याचा साथीदार चाचू यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय . त्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांसह आणखीही काही व्यक्ती स्टिंग ऑपरेशन करण्यात सहभागी असून त्याचा तपास होण्याची गरज असल्याचं प्रवीण चव्हाण यांनी तक्रारीत म्हटलंय . राज्य सरकारने याआधीच या प्रकरणाचा तपास सी आय डी कडे सोपवत असल्याचं जाहीर केलंय . त्यामुळे सी आय डी च्या तपासात नक्की कोणत्या गोष्टी उघड होतायत याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे .
Continues below advertisement