Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलक

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलक

विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करणाऱ्यांचा पराभवच नव्हे तर बंडखोरीचा पराभव करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (सपा) अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी पाच दशकांपूर्वी झालेल्या एका बंडखोरीच्या घटनेची आठवण करून दिली, ज्यामुळे त्यांना विधानसभेतील विरोधीपक्षनेते पद गमवावे लागले होते. पण त्यांच्या दृढनिश्चयामुळे ज्यांनी ज्यांनी त्यांचा विश्वासघात केला त्या सर्वांचा पराभव झाला, असही त्यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार म्हणाले, ” ‘एकदा रस्ता चुकला की, त्याला जागा दाखवायलाच पाहिजे,  त्यामुळे जे जे सोडून गेले त्या सर्वांना पाडायचे आहे आणि साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं. संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाद करायचा नाही. असा थेट इशाराच  शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola