Political Slugfest: 'कोण तो Waris Pathan? त्याच्यावर गुन्हा दाखल करा', Pratap Sarnaik भडकले

Continues below advertisement
मीरा रोडमधील (Mira Road) दासकुळपाडा येथे दोन गटांतील वादानंतर राजकीय वातावरण तापले आहे. एमआयएमचे (AIMIM) नेते वारिस पठाण (Waris Pathan) आणि मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यात यावरून शाब्दिक चकमक उडाली आहे. 'बाहेरचे लोक येऊन स्वतःची पोळी भाजत असतील तर त्यांच्यावर आधी गुन्हा दाखल करावा पाहिजे, कोण तो वारिस पठाण आहे?', असा संतप्त सवाल प्रताप सरनाईक यांनी केला आहे. पोलिसांनी एकाच गटावर कारवाई केल्याचा आरोप करत वारिस पठाण यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन दुसऱ्या गटावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना, बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे मीरा भाईंदरचे वातावरण बिघडत असल्याचे सरनाईक म्हणाले. शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक आमदार सक्षम असून, अनधिकृत बांधकामांमुळेच हे वातावरण खराब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola