Prakash Shendage : मागासवर्ग आयोगाच्यावतीने केला सर्वेक्षण ताबडतोब थांबवा, प्रकाश शेंडगेंची मागणी

Prakash Shendage : मागासवर्ग आयोगाच्यावतीने केला सर्वेक्षण ताबडतोब थांबवा, प्रकाश शेंडगेंची मागणी

हिंगोली : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी आणि न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे महत्वाचे आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सरकारने मागासवर्ग आयोगाला (Maharashtra State Backward Class Commission) सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे, शुक्रवारी पुण्यात झालेल्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत मराठा समाजासह इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, आता यालाच ओबीसी नेत्यांकडून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण ताबडतोब थांबवा अशी मागणीच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shedge) यांनी केली आहे. तसेच, मराठा समाजाचे मागासलेपण कितीवेळा तपासणार, आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा असेही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola