Prakash Mehta : प्रकाश मेहता विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

Prakash Mehta : प्रकाश मेहता विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक


विधानसभा जवळ आलेल्या असताना आता इच्छुक उमेदवार जोरदार तयारी ला लागलेले पाहायला मिळत आहेत. राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री भाजप नेते प्रकाश मेहता यांनी आज मैत्रिदिनानिमित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या अगोदर देखील मेहता यांनी आपण विधाभसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर भाषणात सांगितले होते, आज ही त्यानी आपण निवडणूक लढणार इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र घाटकोपर पूर्व मध्ये सध्या पराग शहा हे भाजप चे आमदार असल्याने काही दिवसात मेहता आणि शहा यांच्यात उमेदवारीची रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. पक्ष आपला विचार करेल आणि पक्षाने दुसरा आपल्या बद्दल विचार केल्यास त्या दुसऱ्या विचाराचा ही आपण विचार करू अशी प्रतिक्रिया या वेळी प्रकाश मेहता यांनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola