Zero Hour : गोपीनाथ मुंडेंच्या वारशावरून पुन्हा वाद, मामा प्रकाश महाजन मैदानात

Continues below advertisement
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशावरून पुन्हा एकदा वाद पेटला असून, या चर्चेत पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी त्यांची बाजू ठामपणे मांडली आहे. 'जोपर्यंत पंकजा आहे, तोपर्यंत गोपीनाथरावांच्या वारसाचा प्रश्न कुणी निर्माण करू नये, तो वारसा फक्त पंकजाकडे आहे, दुसऱ्या कुणाकडे नाही,' असे थेट मत महाजन यांनी व्यक्त केले. छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते, ज्याला करुणा मुंडेंनीही दुजोरा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रकाश महाजन यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. भाऊबीजेला मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले असताना हा 'मिठाचा खडा' का टाकला जात आहे, असा सवाल त्यांनी विचारला. पंकजा यांनी स्वतःच्या हिमतीवर गोपीनाथ गड उभारला असून पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे, त्यामुळे त्यांच्या वारशावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असेही महाजन यांनी ठामपणे सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola