Shaktipeeth Expressway: 'महामार्गात बदल होऊ शकतो', मुख्यमंत्री Fadnavis यांची मोठी घोषणा; विरोधानंतर सरकार नरमले?
Continues below advertisement
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गावर (Shaktipeeth Expressway) महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. या महामार्गाला शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासह अनेक भागांतून विरोध होत आहे. 'शक्तिपीठ महामार्गामध्ये बदल होऊ शकतो,' असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले आहे. विशेषतः सोलापूर (Solapur), सांगली (Sangli) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांमध्ये बदलाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दिवाळी मिलननिमित्त नागपूरच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे संकेत दिले. सरकारच्या या पवित्र्यामुळे, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रखर झालेल्या या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement