Prakash Mahajan Nagpur : अनेकांचा डोळा राजकीय आरक्षणावर, प्रकाश महाजन यांचा निशाणा कुणावर?

Continues below advertisement

Raj Thackeray Vidarbha visit: राजकीय नेत्यांच्या गाडी अडवण्याच्या आणि विरोधात घोषणा देण्याच्या घटनेनंतर राजकारण चांगलच तापल्याचं दिसून आलं आहे मराठवाड्यात राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा असताना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या, त्यावेळी सुपारीबाज अशा घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. आता येत्या 21 तारखेपासून राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दौरे, बैठका, यात्रा, भेटीगाठी यांना वेग आला आहे. अशातच या घटनांमुळे आता पक्षाकडूनच खबरदारीचा उपाय म्हणून निवेदन देण्यात येत आहे.  

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेला घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक आठवड्याच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहे. या निमित्त सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या दौऱ्यात मराठवाड्यासारखे निषेधाचे काही प्रकार घडले तर आम्ही विरोधकांना जशास तसे उत्तर देऊन असा इशारा मनसे सैनिकांनी दिला आहे. कायदा सुव्यवस्थेचा काही प्रकार घडला तर याला पूर्णतः पोलीस यंत्रणा जबाबदार असेल असे मनसेच्यावतीने पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले आहे.

मनसेचे भंडारा संपर्क अध्यक्ष मनदीप रोडे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यात जो अडथळा आणेल, तो घरी परत जाणार नाही, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि इतरांना दिला आहे. जो कोणी या दौऱ्यादरम्यान धुळघुस घालण्याचा प्रयत्न करेल त्याचा चांगलाच समाचार घालेल जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram