Prakash Mahajan on BJP : गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल झालाय'

छत्रपती संभाजीनगर : गोपीनाथ मुंडे यांनी जळवळीतून उभा केलेला पक्ष हा आता प्रोफेशनल झाला आहे. विशेष म्हणजे त्यांचे शिष्य समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पक्षाची ही अवस्था केली याची खंत आहे असं वक्तव्य मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलं. ज्यांच्याविरोधात मोर्चा काढला तेच आज भाजपसोबत सत्तेत आहेत असंही ते म्हणाले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाजन यांनी भाजपच्या धोरणावर जोरदार टीका केली. 

प्रकाश महाजन म्हणाले की, "पूर्वी चळवळीत काम करणारे लोक भाजपमध्ये आणले जायचे. गोपीनाथ मुंडे हे स्वतः चळवळीतून आलेले नेते होते. तसेच चळवळीतील सर्वच नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. आज भारतीय जनता पक्षाची अवस्था पाहिल्यावर खंत वाटते. आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते. अशोक चव्हाण, अजित पवार , छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक लोक आज भाजपसोबत आहेत. संभाजीनगरमध्ये सार्वजनिक सिंचन घोटाळ्यासंदर्भात एक मोर्चा निघाला होता. त्यात गोपीनाथ मुंडे यांचं डोकं फुटलं होतं. ज्याच्या विरोधात तो मोर्चा निघाला होता त्या नेत्याच्या बाजूला आज देवेंद्र फडणवीस बसतात हे दुर्दैव आहे. संघर्षाच्या वेळी अनेक लोक भाजपसोबत होते. पण सत्ता आल्यानंतर ते कुठेच नाहीत. त्यामुळे भाजप आता प्रोफेशनल पक्ष झाला आहे."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola