Vinod Dattatray on Prakash Devtale : प्रकाश देवतळे यांनी वेणूगोपाल यांचं पत्र चोरुन व्हायरल केलं
Continues below advertisement
चंद्रपूर ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या फेरनियुक्तीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि नाना पटोले यांच्या गटातील नेते विनोद दत्तात्रेय यांनी प्रकाश देवतळे यांच्यावर गंभीर आरोप केलाय.. देवतळे यांनी केसी वेणूगोपाल यांचं पत्र चोरून समाज माध्यमांमध्ये वायरल केल्याचा आरोप दत्तात्रेय यांनी केला आहे. वेणूगोपाल यांचं पत्र फक्त नाना पटोले आणि एच.के पाटील यांनांच पाठवण्यात आला होतं.. ते पत्रकारांपर्यंत कसं पोहोचलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद आता वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्ह आहेत...
Continues below advertisement