Prakash Ambedkar : 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी मुंबईला येणं टाळावं, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन
Continues below advertisement
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनानं मनाई केली आहे. सभा, संमेलनं घेण्यास किंवा मोर्चा काढण्यासही राज्य शासनानं परवानगी नाकारली आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Continues below advertisement