Sushma Andhare on Phaltan Doctor Case: 'हॉटेलवर बोलावून हत्या केली', सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Continues below advertisement
फलटणमधील डॉक्टर हत्या प्रकरणात शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 'मृत तरुणीला हॉटेलवर बोलावून तिची हत्या केली,' असा खळबळजनक दावा अंधारेंनी केला आहे. मृत डॉक्टरच्या बहिणीच्या हवाल्याने, पत्रातील आणि हातावरील सुसाईड नोटमधील हस्ताक्षर वेगळे असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. निंबाळकर यांचा हॉटेल मालकाशी संबंध असून, ते भाजपाचे संभाव्य नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचा आरोपही अंधारेंनी केला. यासोबतच, निंबाळकर हे उसतोड कामगारांचे शोषण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कामगारांना उचलून आणून, बेदम मारहाण करून त्यांच्यावर खोट्या पोलिस तक्रारी दाखल केल्या जातात आणि अशा २७७ तक्रारी दाखल झाल्याचे अंधारेंनी म्हटले आहे. पीडित कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचा उल्लेखही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement