Prakash Ambedkar : ठाकरे आणि शिंदेंमध्ये समझोता, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक आरोप

Prakash Ambedkar : ठाकरे आणि शिंदेंमध्ये समझोता, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक आरोप

उबाठा सेनेने त्यांचा उमेदवार लढणार आहे की नूरा कुस्तीचा आहे एवढे सांगावं. "एकनाथ शिंदे आणि उबाठा सेना या दोघांमध्ये समझोता झालाय. निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका" अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी म्हणाले उद्धव ठाकरे अडचणीत आले, तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, उबाठा सेनेने भाजप सोबत समझोता केलाय. काँग्रेसने देखील उबाठा सेनेपासून फारकत घेतली ते यांचा प्रचार करत नाहीत. काँग्रेसला लक्षात आलं, की उबाठा सेनेने आपल्याला फसवलं असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर कल्याण लोकसभेचे वंचित चे उमेदवार डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचार सभेसाठी उल्हासनगर मध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपसह उद्धव ठाकरेंवर देखील घणाघाती टीका केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola