Delhi Blast: 'स्फोटाचे साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडले', Prakash Ambedkar यांचा अकोल्यातून गंभीर आरोप
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढत हे सरकारचे पूर्ण अपयश असल्याचे म्हटले. स्फोटाच्या वेळेवर संशय व्यक्त करत, यामागे बाह्य शक्ती आहे की अंतर्गत, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. 'इंटर्नल ब्लास्टिंगचे जेवढे काय मटेरियल सापडलेले आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे,' असा गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना थांबतील.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement