Delhi Blast Car: दिल्ली स्फोट प्रकरणातील डॉक्टर उमरचा कारचा सीसीटीव्ही समोर
Continues below advertisement
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीतील स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर हा तपास वर्ग करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉक्टर उमर हा या संपूर्ण हल्ल्याच्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची माहिती आहे'. या स्फोटामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार संशयित डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये फरीदाबादमधून डॉ. आदिल, पुलवामामधून डॉ. उमर मोहम्मद आणि डॉ. मुज्जमिल, तर लखनौमधून डॉ. शाहीन शाहिद यांचा समावेश आहे. तपासात फरीदाबाद आणि सहारनपूर कनेक्शनही समोर आले असून, परवेझ अन्सारी नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या आणि इंटिग्रल युनिव्हर्सिटीचा पास असलेल्या कारचाही शोध सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement