Prajakta Mali on Suresh Dhus : सुरेश धसांनी माफी मागितली, प्राजक्ता माळीकडून प्रकरणावर पडदा

Continues below advertisement

Prajakta Mali on Suresh Dhus : सुरेश धसांनी माफी मागितली, प्राजक्ता माळीकडून प्रकरणावर पडदा

आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची जाहीरपणे माध्यमांसमोर येऊन माफी मागितल्यानंतर आता प्राजक्ता माळीनेही सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर आपल कुठलीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच,आमदार सुरेश धस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जाहीरपणे माफी मागितल्यानंतर दादा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात, असे म्हणत प्राजक्ताने सुरेश धस यांच्याबद्दलही चांगले उद्गार काढले आहेत. त्यामुळे, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वेगळ्याच वादाचं तोंड फुटलेला प्राजक्ता माळी-सुरेश धस यांच्या वादाचा मुद्दा आता संपुष्टात आला आहे. दरम्यान, आमदार धस यांनी भाजप नेत व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत फोनवर झालेल्या संवादानंतर व्हिडिओच्या माध्यमातून प्राजक्ता माळीची जाहीरपणे माफी मागितली होती. त्यानंतर, आता प्राजक्ता माळीनेही (Prajakta mali) धस यांच्यावर कुठलाही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यापूर्वी धस यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. 

आमदार सुरेश धस यांनी अत्यंत मोठ्या मनाने घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. दादा, तुम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंय. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती, हे आपण सगळे जाणतो. ही छत्रपतींची भूमी आहे, आणि इथे छत्रपतींचे विचार पुढे चालवले जातात हेच तुम्ही ह्या कृतीतून दाखवून दिलंय, असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे आभार मानले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram