Powai Hostage Crisis: मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा मृत्यू, संपूर्ण बातमी

Continues below advertisement
मुंबईच्या पवई (Powai) भागातील ओलीस नाट्य (Hostage Crisis) एका थरारक अंतानिशी संपले असून, मुलांना ओलिस धरणारा आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) याचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला आहे. 'माझ्या नादी लागू नका... जर का मला चिथवण्याचा प्रयत्न केला तर मी या स्टुडिओला या संपूर्ण भागाला आग लावून देणार', अशी धमकी रोहित आर्यने दिली होती. वेब सीरिजच्या ऑडिशनच्या बहाण्याने राज्यभरातून आलेल्या १७ मुलांना आर्यने एका स्टुडिओत डांबून ठेवले होते. शिक्षण विभागाकडे 'स्वच्छता मॉनिटर' योजनेचे सुमारे ४५ लाख रुपये थकल्याने तो आर्थिक विवंचनेत होता, याच नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आर्यला रोखण्यासाठी गोळीबार केला, ज्यात तो जखमी झाला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola