Powai Hostage Crisis : 'त्याच्या पायात गोळी का मारली नाही?', रोहित आर्य एन्काऊंटरवर वकील नितीन चाचपुतेंचा सवाल
Continues below advertisement
पवई (Powai) येथील आर्य स्टुडिओमधील (Arya Studio) ओलिसनाट्य (Hostage Crisis) आणि रोहित आर्यच्या (Rohit Arya) एन्काउंटरवरून आता नवीन वाद उफाळून आला आहे. ‘तो काही हार्ड अँड फास्ट क्रिमिनल नव्हता...तुम्ही त्याच्या पायात गोळी का न मारली? त्याला न्यूट्रॉल का नाही केलं?’, असा सवाल करत अॅडव्होकेट नितीन चाचपुते यांनी हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला आहे आणि याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, घटनेच्या वेळी स्टुडिओत उपस्थित असलेल्या मंगला पाटणकर या आजींनी रोहितची संपूर्ण टीम या कटात सामील असल्याचा आणि प्रियंका नावाची एक मुलगी फोनवर बोलून हसत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी मात्र पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. रोहितने मुलांना ओलिस ठेवण्यासाठी चित्रपट ऑडिशनचा बनाव रचला होता, ज्यासाठी त्याने अभिनेत्री रुचिता जाधव, गिरीश ओक (Girish Oak) आणि उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kanetkar Kothare) यांसारख्या कलाकारांशी संपर्क साधला होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement