Rohit Arya Encounter : सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंकडून रोहित आर्यचा एन्काऊंटर
Continues below advertisement
पवईमधील (Powai) ओलीस नाट्य (Hostage Drama) अखेर संपले आहे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे (Amol Waghmare) यांनी आरोपी रोहित आर्याचा (Rohit Arya) एन्काउंटर (Encounter) केला आहे. 'स्वसंरक्षणार्थ किंवा मुलांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी फायरिंग केली असेल तर ते कायदेशीर आहे,' असे मत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी व्यक्त केले. पवई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करत १७ मुलांसह १९ जणांची सुखरूप सुटका केली. आरोपी रोहित आर्याने स्टुडिओच्या खिडक्यांना सेन्सर लावले होते, मात्र पोलिसांनी धाडसी कारवाई करत त्याला रोखले. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनबद्दल आणि पोलिसांच्या समयसूचकतेबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि मुलांच्या पालकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement