Pothole Death | Bhiwandi मध्ये खड्ड्यांमुळे 3 बळी, नागरिकांचा Rasta Roko आंदोलन
भिवंडीत रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. मध्यरात्री Siraj Hospital समोरच्या रस्त्यावर दुचाकी घसरून एका नागरिकाचा मृत्यू झाला. मागून येणाऱ्या Container खाली चिरडलं गेल्यानं हा अपघात घडला. या अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करत Rasta Roko आंदोलन केले. Bhiwandi शहर आणि ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "जीव गेल्यानंतरच रस्त्यांची डागडुजी होणार का?" असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे होणारे अपघात आणि त्यात जाणारे जीव ही गंभीर समस्या बनली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. Anil Verma, प्रतिनिधी, यांनी सध्याच्या परिस्थितीवर माहिती दिली.