Nitesh Rane Matka Raid | Sindhudurg पोलीस दलात खळबळ, पोलीस निरीक्षक निलंबित!

Continues below advertisement
मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गातील मटका अड्ड्यावर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईवरून त्यांच्यावर टीका झाली, मात्र त्यांनी पालकमंत्री म्हणून ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले. "मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माजी नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी कालची कारवाई केलेली आहे," असे त्यांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचा मंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्या अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर, पालकमंत्र्यांनी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्यासोबत काही कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवारांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola