Supriya Sule : 'स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% जागा द्या', Sharad Pawar गटाच्या महिलांची आक्रमक मागणी

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीची आजपासून दोन दिवसीय जिल्हास्तरीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या प्रमुख नेत्या मार्गदर्शन करणार आहेत. 'आजच्या बैठकीमध्ये पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महिलांसाठी पक्षाकडून जागा देण्यात याव्यात ही प्रमुख मागणी असेल,' असे सूत्रांनी म्हटले आहे. पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या जिल्हानिहाय सर्वसाधारण बैठकीनंतर आता विशेष महिला बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांचे संघटन आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर जोर दिला जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola