Lunar Eclipse 2022 : आज वर्षातील शेवटचं चंद्रगहण, महाराष्ट्रात दिसण्याची शक्यता किती?
Continues below advertisement
Lunar Eclipse 2022 : आज 2022 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan) होणार आहे. सूर्यग्रहणाच्या 15 दिवसानंतर म्हणजे देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) लागणार आहे. 2022 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी लागलं होतं. आणि आज वर्षातलं हे शेवटचं अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 8 नोव्हेंबर रोजी ग्रहण IST दुपारी 2.39 वाजता सुरू होईल, एकूण ग्रहण IST दुपारी 3.46 वाजता सुरू होईल. संपूर्णत: जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असेल तेव्हा ग्रहणाचा टप्पा IST संध्याकाळी 05.11 वाजता संपेल आणि ग्रहणाचा आंशिक टप्पा IST संध्याकाळी 6.19 वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर 07.26 वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.
Continues below advertisement