Popatrao Pawar Felicitation : गाव सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या पोपटराव पवार यांचा गौरव
अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला हभप भास्करगिरी महाराज, पारनेरचे आमदार निलेश लंके, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोपट पवार यांनी 1990 पासून हिवरे बाजारमध्ये सिंचनाची मोठी कामं केली. त्याची दखल घेत भारत सरकारने पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान केला.