मंदिरांच्या दानपेटीत भरभरून दान, विठ्ठलचरणी 1.2 कोटींचं दान, तर तुळजाभवानीला 4.89 कोटींचं दान
Continues below advertisement
7 ऑक्टोबरला घटनस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरांची द्वारं भक्तांसाठी खुली झाली. निर्बंध असूनही दसरा दिवाळी या सणाच्या काळात मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. देवदर्शनाला आलेल्या भक्तांनी देवाच्या दान पेटीत भरभरून दानही टाकल्याचं पाहायला मिळतंय. 7 ऑक्टोबरपासून आजपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 1 कोटी 20 लाखांचं दान भक्तांनी अर्पण केलयं. तर तुळजापूरच्या तुळजाभवानी आईच्या पदरातही भाविकांनी 4 कोटी 89 लाखांचं दान दिलंय. तुळजाभवानी मातेला अडीच किलो सोनं 34 किलो चांदीही वाहण्यात आलंय.
Continues below advertisement