Pooja Khedkar Washim : मी काहीही बोलणार नाही...पूजा खेडकर दुसऱ्या दिवशीही गप्प?

Continues below advertisement

Pooja Khedkar Washim : मी काहीही बोलणार नाही...पूजा खेडकर दुसऱ्या दिवशीही गप्प?

Pooja Khedkar : कोट्यवधींची संपत्ती आणि आलिशान लाईफस्टाईलने प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) चांगलीच चर्चेत आली आहे. ट्रेनी आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी करणे, तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावणे, अशा विविध कारणांनी त्या राज्यभरात चर्चेचा विषय बनल्या आहेत. नुकतीच पूजा खेडकरची वाशिम (Washim) येथे बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांचे दररोज नवनवीन कारनामे उघडकीस येत असून आता पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मंगळवारी पूजा खेडकरची वाशिममध्ये उचलबांगडी करण्यात आली आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याच्या कारणावरून ती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून आता 30 जुलै 2025 पर्यंत वाशिममध्ये तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी असणार आहे. त्यातच आता पुणे महापालिकेचा अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram