Pooja Khedkar Special Report : मुलगी रागात, आईचा थयथयाट; वाद जोरात!
Pooja Khedkar Special Report : मुलगी रागात, आईचा थयथयाट; वाद जोरात!
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन असल्याचे समोर आलं आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणले आहे.. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचे ट्विट विजय कुंभार यांनी केलं आहे.. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान घेतली असल्याचे बोलल जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्याने खेडकर यांचे बारामती कनेक्शन समोर आलं आहे.वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्यात. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलीय. पूजा खेडकरच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली, एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावरही त्या धावून आल्या, आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. डण्यास नकार दिला. पुणे पोलिसांनी खेडकर यांना वॉट्स अँपवर नोटीस पाठवलीय.