Pooja Khedkar knee : पूजा खेडकरचा गुडघा 7 टक्के अधू असल्याचं प्रमाणपत्र समोर

Continues below advertisement

आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन ही समोर आलं आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून ही अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं आहे. डाव्या गुडघा सात टक्केवारी कायमस्वरूपी आधु असल्याचं या प्रमानपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र समोर आलेलं आहे.  गुडघ्यात सात टक्के आधु, पण दिसत नसल्याचं तपासात निष्पन्न झालं नव्हतं - अधिष्ठाता राजेश वाबळे  राजेश वाबळे : पूजा खेडकर ने ऑनलाइन पद्धतीने अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पूजा यांना बोलावून आम्ही तपासण्या केल्या, यात त्या सात टक्के गुडघ्यात कायमस्वरूपी आधु असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार हे प्रमाणपत्र आम्ही दिलं. मात्र त्यांना कमी दिसत होतं हे आमच्या तपासणीत आढळलं नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram