Pooja Khedkar Case Pune : UPSC कडून पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार?
Pooja Khedkar Case Pune : UPSC कडून पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार?
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) उमेदवारी रद्द केलेली प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर ही १४ ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने तिला पुढील दोन दिवसांत हजर राहण्याची नोटीस केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने बजावली आहे. या नोटीसची प्रत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमीने (यशदा) खेडकर हिच्या नगर आणि पुण्यातील निवासस्थानी देण्याची ले सूचना केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तणुकीबाबत राज्य शासनाला अहवाल पाठविल्यानंतर खेडकर हिचे पुणे जिल्ह्यातून प्रशिक्षण रद्द करून वाशिम जिल्ह्यात उर्वरित प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर खेडकर हिचे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यात खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) रद्द केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने वैयक्तिक सुनावणीसाठी खेडकर हिला पाचारण केले आहे. त्याकरिता नोटीस बजावली.