Pooja Chavan Death Case | संजय राठोंडावर आकसानं कारवाई करु नये : पोहरादेवी धर्मपीठ

पूजा चव्हाण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी पोहरादेवी धर्मपीठानं केलीय. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवीत बंजारा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री संजय राठोड यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बंजारा समाजाच्या वतीनं याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये असंही पोहरादेवी धर्मपीठानं म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola