Shiv Jayanti 2021 | रत्नागिरीच्या देवरुखमध्ये साकारली महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी

Continues below advertisement
जगात लहान, मोठ्या अशा अनेक विक्रमांची नोंद होत असते. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील विलास रहाटे या तरूणानं छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी काढण्याचा विक्रम केला आहे. तीन बाय तीन सेंटिमीटर इतक्या लहान आकाराची ही रांगोळी आहे. तर ही रांगोळी काढण्यासाठी लागलेला वेळ हा 42 मिनिटं आणि 37 सेकंदाचा होता. यासाठी पाच ते सहा ग्रॅम रांगोळीचा वापर करण्यात आला असून मागील वर्षभरापासून यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर या वर्षीच्या शिवजंयतीला रांगोळी कलाकार असलेल्या विलासला यामध्ये यश आलं. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह आणि सहा रेकॉर्ड बुकमध्ये या रांगोळीची नोंद झाली आहे. दरम्यान, महाराजांच्या जगातील सर्वात लहान रांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram