Maharashtra Politics | शिवसेनेची नवी खेळी, पक्षफुटीला आळा घालणार?
या प्रकरणात वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या SIT च्या माध्यमातून संबंधित गुन्ह्याची चौकशी केली जाईल. या चौकशीत गुन्ह्याची व्याप्ती, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी राजकीय किंवा सामाजिक दृष्ट्या याला वेगळी वळणं देत आहे का, याचाही तपास केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "आपण असा निर्णय केलेला आहे कि वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू." दुसरीकडे, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पक्षफुटीचा उद्धव ठाकरेंना ज्याप्रकारे फटका बसला, त्यातून सावध होत शिंदेंच्या शिवसेनेने ही पावले उचलली आहेत. शिवसेना फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने स्थानिक पातळीवर शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयांवर ताबा मिळवला होता. भविष्यात असे प्रकार आपल्यासोबत होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिवकोष, शिवसेना, शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.