Ashish Shelar On Raj Thackeray : ठाकरेंच्या आरोपांना पुराव्यांनी उत्तर, नवी मतदारयादी समोर

Continues below advertisement
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुबार मतदारांवरून केलेल्या आरोपांना आता जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 'राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय, दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय,' असा थेट सवाल उपस्थित करत, ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज ठाकरे यांनी कल्याण, डोंबिवली आणि मलबार हिलमधील पाटील, भोईर अशा मराठी नावांचा उल्लेख केला होता. याला उत्तर म्हणून कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघातील उदाहरणे समोर आणली आहेत. एकाच यादीत दोनदा नावे असलेल्या इम्रान कादर भागवान (Imran Qadar Bhagwan) सारख्या मतदारांकडे ठाकरे बंधूंनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही केवळ मराठी किंवा हिंदू मतदारांविरोधातील भूमिका असून तुष्टीकरणाचे राजकारण असल्याचा दावाही करण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola