Ravikant Tupkar On Bacchu Kadu Meeting : बच्चू कडू-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झालं? रविकांत तुपकरांनी सगळं सांगितलं

Continues below advertisement
शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत कर्जमाफीवरून (Loan Waiver) झालेल्या वादळी बैठकीचा तपशील उघड केला आहे. ‘आमदारांना आणि मंत्र्यांना कापा, या माझ्या वक्तव्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे,’ असे तुपकर यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चिडचिड केली आणि दोन तास केवळ तारखेवरून घमासान चर्चा झाल्याचे तुपकर म्हणाले. सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि अखेरीस ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली, ज्यावर तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा केवळ एक मध्यम मार्ग असून आंदोलन थांबलेले नाही, असे सांगत तुपकर यांनी भविष्यात सरकारच्या 'बुडाख्याला आग लावणारं' व्यापक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola