Zero Hour : गुंडांना राजकीय आश्रय, BJP नेते रडारवर; Rohit Pawar यांचा मोठा आरोप

Continues below advertisement
गुंडांना राजकीय आश्रय दिल्याचा आरोप गृहराज्यमंत्र्यांवर होत आहे. भाजपचे नेतेही महाविकास आघाडीच्या रडारवर आले आहेत. रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे नाव घेतले आहे. राम शिंदे यांनी नीलेश गायकवाडचा उपयोग मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत प्रचारक म्हणून केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. गृह खात्याचा दबाव असल्याचं सांगत फडणवीसांनाही अप्रत्यक्ष लक्ष्य केले आहे. तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि संजय बांगर यांचेही गायकवाडशी कनेक्शन असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. 'एक गुंडाच्या बावाला तुम्ही लाईस आहे तिथं बंदुकीचं लाइसेन्स देता मग कुठून कुठे ते वरदास्तशिवाय होऊच शकत नाही,' असे रोहित पवार म्हणाले. भूम पारंडामध्ये पवनचक्क्या लावताना शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी नीलेश गायकवाडचा वापर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे समीर पाटील यांचेही नीलेश गायकवाड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola