Sandipan Bhumare : राज ठाकरेंसाठी सुतळी बॉम्ब, एकनाथ शिंदे म्हणजे तोफ; राजकीय फटाकेबाजी

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी ABP माझासोबत बोलताना राजकीय फटाकेबाजी करत ठाकरे गटावर (Thackeray Faction) जोरदार निशाणा साधला आहे. 'आदित्य ठाकरेंसाठी (Aaditya Thackeray) फक्त लवंगी फटाका, कारण तो १२ महिन्यांचा मुलगा सुद्धा वाजवू शकतो,' असं म्हणत भुमरेंनी थेट आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. इतकंच नाही, तर उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) तेललसूण फटाका, तर लोकसभेत पराभूत झाल्यास हिमालयात जाण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना (Chandrakant Khaire) हिमालयात जाण्यासाठी 'रॉकेट' घेऊ, असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊतांसाठी (Sanjay Raut) रोज वाजणारी बीड फटाक्यांची माळ, तर अंबादास दानवेंसाठी (Ambadas Danve) केवळ चमकणारी पण आवाज न करणारी 'सुरसुरी' त्यांनी निवडली. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी मात्र त्यांनी 'तोफ' खरेदी करणार असल्याचं सांगत त्यांचं नेतृत्व मान्य केलं. कॅमेरामन धनंजय दारुंगतेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola