SKILLS FOR SANSKAR: 'पौरोहित्य हा व्यवसाय आहे का?'; Nashik ITI च्या Vedic Course ला पुरोहितांचा विरोध

Continues below advertisement
नाशिकच्या आयटीआय (ITI) कॉलेजमध्ये 'वेदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट' हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून याला त्र्यंबक मंदिर विश्वस्त आणि स्थानिक पुरोहितांनी विरोध दर्शवला आहे. 'पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्वरूप देऊन असा कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलं आहे?', असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने पुरोहितांची गरज भासणार असल्याने, ही गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अल्प मुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत अध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात असले तरी, याला स्थानिक पुरोहित संघाकडून तीव्र विरोध होत आहे, ज्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola