Kolhapur Police | अतिक्रमण हटवताना नागरिक आक्रमक, कोल्हापूर पोलिस- नागरिकांमध्ये धक्काबुक्की
कोल्हापूर पोलिस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. अतिक्रमण हटवताना पोलिस आणि नागरिकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. पोलिस अतिक्रमण काढायला गेले असताना नागरिक आक्रमक झाले. य़ावेळी महिला आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्येही वादावादी झाली. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वंसत बाबर यांना धक्काबुक्कीही झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. याप्रकरणी कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली