Lonavala : लोणावळा पोलिसांकडून तब्बल 4 कोटींची रोकड ताब्यात, चौकशी सुरू

पुण्यातील लोणावळा पोलिसांनी तब्बल चार कोटींची रोकड पकडली आहे. ही कारवाई पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर करण्यात आली. अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैश्यांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या संशयित कारला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालकाने गाडी तशीच ती पुढे नेहली. मग पोलिसांनी पाठलाग करून गाडीसह चालकाला ताब्यात घेतले, गाडीची झडती घेतल्यावर चार कोटींची रक्कम आढळली. ही रक्कम नेमकी कुठं नेहली जात होती हे अद्याप अस्पष्ट आहे. तर दुसरीकडे हा तपास आयकर विभाग ही करतायेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola