Fruit Beer Solapur : सोलापूरात Fruit Beerच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा ABP Majha

सोलापुरातील घोंगडे वस्तीत रसायनमिश्रित फ्रूट बीयर कारखान्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकत कारवाई केलीय. या प्रकरणी सोलापूरतल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाच आरोपीला अटक करण्यात आलीय. तर मूळ मालक हा अद्याप फरार आहे. फ्रुट बीयरच्या नावाखाली अवैधरित्या घातक रसायन विक्री सुरू असल्याची माहिती आयुक्तालयातील पोलीस भरारी पथकाला माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने शुक्रवारी रात्री अचानक धाड टाकून ही कारवाई केली. या धाडीत बॉटल सील करण्याचे मशीन, फ्रूट बीयरने भरलेले बॉटल, एक मालवाहतूक गाडीही जप्त करण्यात आली. यावेळी बाराशेहुन अधिक अवैध फ्रुट बियरच्या बॉटल पोलिसांना आढळून आल्या आहेत. या अवैध फ्रुट बियरची विक्री करताना आरोपी प्रभाकर आनंतया भंडारी यास पोलिसांनी अटक केलीय. तर मूळ मालक मुबीन बडेसाब शेख हा मात्र अद्याप फरार आहे. नियमानुसार मुबीन शेख यांना बियर विक्रीची परवानगी आहे. मात्र फ्रुट बियरच्या नावाखाली रसायन मिश्रित करून विकत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अधिक तपासासाठी अन्न औषध प्रशासनाने देखील नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola