Matoshree Drone Scare: 'मातोश्री'वर ड्रोनच्या घिरट्या, Uddhav Thackeray यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न?
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालताना दिसल्याने एकच खळबळ उडाली. पॉड टॅक्सीसाठी (Pod Taxi) एमएमआरडीए'कडून (MMRDA) सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. सुरुवातीला, ठाकरेंवर पाळत ठेवण्याच्या उद्देशाने हे ड्रोन फिरत असल्याचा संशय निर्माण झाला होता, ज्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ झाली. एबीपी माझाच्या वृत्तानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएने या ड्रोन सर्वेक्षणासाठी रीतसर परवानगी घेतली होती. हे सर्वेक्षण वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि खेरवाडी परिसरात सुरू असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचा भाग होते. या स्पष्टीकरणानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement