Indrajit Bhalerao Majha Katta : '...जो लढतो तो शीख असतो!',शरद जोशींच्या सभेतला 'तो' किस्सा
Continues below advertisement
ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव (Indrajit Bhalerao) यांनी शेतकरी नेते शरद जोशी (Sharad Joshi) आणि भूपेंद्र सिंह मान (Bhupinder Singh Mann) यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी संघटनेच्या (Shetkari Sanghatana) एका विशाल अधिवेशनाची आठवण सांगितली आहे. भालेराव यांच्या मते, 'इंद्रजीत भालेराव ने आप सबको लड़ने को बोला और लड़ने वाला बोले तो शीख होता है शीख। इसके लिए मैं जो बोला वो भी सच है। तुम जो बोले वो भी सच है,' असं भूपेंद्र सिंह मान म्हणाले होते. शरद जोशींच्या मुख्य भाषणापूर्वी कवी इंद्रजीत भालेराव यांनी 'कुंडबेच्या पोरा आता लढायाला शीख' ही कविता सादर केली. यातील 'शीख' या शब्दावर पंजाबचे शेतकरी नेते भूपेंद्र सिंह मान यांनी मार्मिक टिप्पणी केली. मान यांनी 'शीख' शब्दाचा अर्थ 'सिख' असा घेत कवितेचं कौतुक केलं. तेव्हा शरद जोशींनी मराठीतील अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मान यांनी लढणारा 'शीख' असतो, असं म्हणत इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला. या अधिवेशनाला सुमारे सात लाख लोक उपस्थित होते, अशी माहिती भालेराव यांनी दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement