Alliance Rift: 'शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळेल, पण राष्ट्रवादीसोबत नको', BJP पदाधिकाऱ्यांचा एल्गार

Continues below advertisement
महायुतीमध्ये (Mahayuti) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला (NCP) विरोध होत असल्याचे चित्र आहे. 'एकवेळ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळेल मात्र राष्ट्रवादीसोबत नको' अशी थेट भूमिका मराठवाड्यातल्या भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मांडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संभाजीनगरात (Sambhajinagar) भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांना महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत सकारात्मक राहण्याचे सुचवले असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola