Indrajit Bhalerao Majha Katta : लोकप्रिय कवी इंद्रजीत भालेराव यांच्यासोबत 'माझा कट्टा'

Continues below advertisement
'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव (Indrajit Bhalerao) यांनी मराठवाड्यातील (Marathwada) अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे वर्णन केले. 'आलं आलं हे आभाळं आलं सुगीच्या दिसात, माती कालविली त्यानं तोंडामधल्या घासात,' या आपल्या कवितेतील हृदयद्रावक ओळीतून भालेराव यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की जणू आभाळ छातीवर बसून गळा दाबत आहे. पावसाला थांबवण्यासाठी 'पावसाला पोळवणे' या जुन्या लोकविधीची आठवणही त्यांनी सांगितली, ज्यात लोकांच्या श्रद्धेपोटी एका लहान मुलाला हातात पणती देऊन पावसात उभे केले जात असे. काळ बदलला तरी शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे दिवस बदलले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola