Pigeon Row : जैन मुनींचा अजब दावा, डॉक्टरांना म्हणाले मूर्ख
Continues below advertisement
मुंबईत कबुतरांवरून सुरु असलेल्या वादात जैन मुनी कैवल्यरत्न महाराज (Jain Muni Kaivalyaratna Maharaj) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी भर घातली आहे. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी जोरदार टीका केली आहे. 'एखादा दुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं?', असा संतप्त सवाल कैवल्यरत्न महाराजांनी विचारला आहे. दादरमध्ये आयोजित 'कबूतर बचाओ धर्मसभे'त बोलताना, मी डॉक्टरांना मूर्ख मानतो, असेही ते म्हणाले. इतकेच नाही, तर कबुतराच्या विष्ठेमुळे मूत्रपिंड (Kidney) साफ होतं, असा अशास्त्रीय दावाही त्यांनी केला. या सभेला मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) उपस्थित न राहिल्याने त्यांनी सरकारवर मिलीभगत असल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना, मग कोरोनाची पूजा करायची होती का, असा सवाल करत मनीषा कायंदे यांनी या सर्व विधानांचा समाचार घेतला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement