ABP News

PM Narendra Modi Nashik : पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात नतमस्तक ABP Majha

Continues below advertisement

PM Narendra Modi Nashik : पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात नतमस्तक ABP Majha

PM Narendra Modi National Youth Festival Inauguration Nashik नाशिक : आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिन आहे. माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घानाप्रसंगी ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram