PM Narendra Modi Varanasi : माझा तिसरा कार्यकाळ सर्वात भव्य असेल : नरेंद्र मोदी ABP Majha

PM Narendra Modi Varanasi : माझा तिसरा कार्यकाळ सर्वात भव्य असेल : नरेंद्र मोदी ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीत अतिशय मोठं वक्तव्य केलं. आपला तिसरा कार्यकाळ हा सर्वात भव्य आणि प्रभावशाली कार्यकाळ असणार आहे, असं मोदी म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधींना प्रचंड टार्गेट केलं. राहुल गांधींना राम मंदिराचा तिरस्कार आहे, यंदा तर त्यांचं डिपॉझिट देखील जप्त होणार आहे असं मोदी म्हणाले. राहुल गांधींसारखे नेते घराणेशाही मानणारे आहेत, त्यांना तरुणांच्या बुद्धिमत्तेची आणि महत्त्वाकांक्षेची भीती वाटते अशी टीका देखील पंतप्रधानांनी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola