Winter Session 2022 : हिवाळी अधेवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM Narendra Modi यांचं तुफान भाषण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParliament Winter Session : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी देशासह तरुण खासदारांना आवाहन केलंय.
जी-20 च्या माध्यमातून भारताला जगाला सामर्थ्य दाखवण्याची संधी - पंतप्रधान मोदी
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही मोठी संधी आहे. यामुळे भारताला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली आहे, विश्वात भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारताला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत आहे. दरम्यान देशाचे आणि जी-20 संबंधित महत्वाचे निर्णय अधिवेशनात होतील. असं ते म्हणाले. G20 शिखर परिषद ही भारताची क्षमता जगासमोर मांडण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाही, इतकी विविधता, एवढी क्षमता, हे सर्व जगाला कळायला हवे. भारताला आपली क्षमता संपूर्ण जगाला दाखवण्याची संधी आहे. यापूर्वी सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे. त्याचे प्रतिबिंब सभागृहातही दिसणार आहे.