PM Narendra Modi Pohradevi Visit : पंतप्रधान मोदींच्या पगडीची EXCLUSIVE दृश्य ABP Majhaवर

Continues below advertisement

PM Narendra Modi Pohradevi Visit : पंतप्रधान मोदींच्या पगडीची EXCLUSIVE दृश्य ABP Majhaवर

भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil) यांनी अखेर भाजपला सोडण्याचा निश्चय केला असून आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. त्यावेळी, पुढील विधानसभा निवडणुकांसाठीची रणनीती आणि मतदारसंघातील राजकारण यावर भाष्य केलं. तसेच, काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी  काल विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.  जनतेचा आग्रह  असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत, असे म्हणत तुतारी फुंकण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. एकेकाळी काँग्रेस पक्षात त्यांचे सहकारी असलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर स्पष्टपणे भाष्य केलंय. 

अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपात प्रवेश केला, तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसकडून ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. त्यामुळे, काँग्रेसमध्ये त्यांच्यासमवेत काम केलेल्या नेत्यांची मोठी यादी आहे. भाजपातून राष्ट्रवादीमध्ये जाणार असलेले हर्षवर्धन पाटील हेही काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे, एकेकाळचे अशोक चव्हाण यांचे सहकारी असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडण्याबाबत अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram